रस्त्यावर चालत असलेल्या तरुणावर कोसळला बांधकामग्रस्त इमारतीचा भाग, पाहा भयंकर व्हिडीओ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजस्थानमधील भरतपूर येथे एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या बांधकामाचा काही भाग एका तरुणावर पडला. या दुर्घटनेत तो तरुण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेचा भयंकर व्हिडीओ समोर आला असून त्या तरुणासोबत घडलेल्या या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

बुधवारी संध्याकाळी भरतपूरमधील सर्राफा बाजारात ही घटना घडली आहे. दोन तरुण चालत रस्त्याने जात असताना अचानक त्यांच्यावर बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा काही भाग कोसळला. हा ढिगारा त्या दोघांपैकी एका तरुणावर कोसळला तर दुसरा सुदैवाने त्यातून बचावला आहे. या घटनेनंतर स्थानिकांनी त्या तरुणाला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

या प्रकरणी पोलिसांनी केस दाखल केली आहे. पोलीस त्या इमारतीत बांधकाम सुरू असलेल्या घराच्या मालकाला शोध आहेत.