
सामना ऑनलाईन । मुंबई
‘सीमेवर आमची पोरं जातात, कोणा देशपांडे, कुलकर्णींची पोरं जात नाहीत,’ अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी ब्राह्मण समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. राजू शेट्टी यांच्या वक्तव्यानंतर त्याविरोधात ब्राह्मण समाजातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर राजू शेट्टी यांनी जाहीर माफी मागितली. राजू शेट्टी यांच्या वक्तव्यानंतर ब्राह्मण समाजाची बदनामी केल्याचा आरोप करीत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने तीव्र शब्दांत निषेध केला होता. राजू शेट्टी यांच्याविरुध्द आचारसंहिता भंगाची कारवाई करावी अशी मागणीही केली होती. माफी मागताना राजू शेट्टी म्हणाले, माझे वक्तव्य शहिदांचा दर्जा मिळत नसलेल्या बीएसएफ आणि सीआरपीएफ जवानांसाठी होते.































































