
‘कांदा आयात करायचा होता तर तो दोन महिने अगोदर आयात का केला नाही, केंद्र सरकारला शेतकऱ्यांचे काहीच देणे घेणे नाही, केंद्र सरकार शेतकरी प्रश्नांबाबत बेजबाबदार आहे, असा टोला माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज लगावला. भाजपमध्ये मोदी व शहा सोडले तर सर्व शोषित आहेत अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
राज्य सरकारला अभ्यास करायला वेळ दिलाच पाहिजे, मात्र नागपूर अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाने इतर मुद्दे उपस्थित करत काम करू दिले नाही, विरोधी पक्षाला शेतकऱ्यांचे काही देणे घेणे नाही, विरोधी पक्ष बेजबाबदारपणे वागत आहे, असा घणाघाती आरोपही त्यांनी केला, नगर येथे स्वाभिमानी शेतकरी पक्षाची बैठक शासकीय विश्रामगृह आज पार पडली, त्यानंतर शेट्टी पत्रकारांशी बोलत होते.
राजू शेट्टी म्हणाले की केंद्र सरकारने तुर्कस्तान मधून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला, वास्तविक पाहता तो निर्णय त्यांनी दोन महिने अगोदरच घ्यायला पाहिजे होता, कांदा आयात करून एक प्रकारे त्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे, या अगोदरचा कांदा शेतकऱ्यांचा नव्हता तो व्यापाऱ्यांचा होता हे त्यांना माहीत होते निसर्गाच्या खाईतून शेतकरी बाहेर पडत असताना त्याला कांद्याला भाव मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र त्याच वेळेला कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे कांद्याचे दर कोसळले गेले. वास्तविक पाहता या केंद्र सरकारला शेतीतले काहीच कळत नाही असा टोलाही शेट्टी यांनी लगावला. मी संसदेमध्ये शेतमालाला हमी भाव मिळाला पाहिजे व कर्जमुक्ती दिली पाहिजे हे दोन विषय मांडले होते ,वास्तविक पाहता त्यावर या सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही यासारखे दुर्दैव नाही असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च भागत नाही, शेतकरी संकटात सापडला आहे, आज त्यांच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे, प्रत्येक पिकासाठी आज आंदोलन करावे लागते, आज शेतकऱ्यांची बरबादी झाली आहे सरकार चुकीच्या पद्धतीने धोरण राबवत आहे असा आरोपही शेट्टी यांनी यावेळी केला, शेतकऱ्यांना कायमस्वरूपी संकटातून बाहेर काढायचा असेल तर शेतीमालाला हमीभाव व कर्जमुक्ती हे दोन विषय एकाच वेळेला राबवले गेले पाहिजे अशी आपली भूमिका असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
भाजप मधल्या नेत्यांना आज आपल्या साम्राज्याचा सूर्य मावळणार नाही अशा आविर्भावात मध्ये ते वागत आहे असा घणाघाती आरोपही त्यांनी यावेळी केला ,शहा व मोदी सोडले तर भाजपमधील सर्व जण शोषित आहेत असेच चित्र सध्या पाहायला मिळत आहे असेही ते म्हणाले,
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्रातील भाजपचे नेते होते. त्यांनीच आम्हाला या महायुतीमध्ये आणले होते. आता मुंडे नाहीत त्यांचे विचारही भाजप मध्ये संपले आहेत, त्यांच्या बरोबरीला जे त्यांच्या सोबत होते त्या निष्ठावंतांना आता डावलले जात आहे मग ते खडसे असो अथवा कुणीही असो असा आरोपही शेट्टी यांनी केला, छोटे घटक पक्ष महायुतीमध्ये पाहिजे म्हणून 2014 साली आम्ही सोबत होतो, मुंडे यांची शपथ घालून आम्हाला अडवून ठेवले होते असेही ते म्हणाले ,पण आता तळागाळातून आलेले लोक यांना चालत नाहीत भविष्यात भाजपचे अवस्था अतिशय वाईट होईल असेही ते म्हणाले
भाजप नको म्हणून राज्यांमध्ये महाआघाडी स्थापन म्हणुन राज्यामध्ये महाआघाडी स्थापन झालेली आहे. समान कार्यक्रमाच्या आधारे महाआघाडी झाली आहे,जनमताचा दबाव होता म्हणून ही आघाडी स्थापन झाली भाजपाला जर नेस्तनाबूत करायचे असेल तर आघाडीची टिकली पाहिजे नाहीतर भाजपवाले एकेक पक्षाचा लचका तोडतील असेही शेट्टी म्हणाले.
महाआघाडी सरकार स्थापन झालेले आहे त्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा तसेच शेतकऱ्यांची विजेचे बिल माफ झाले पाहिजे एवढीच आमची माफक अपेक्षा आहे लवकरात लवकर त्यांनी तो निर्णय घेतला पाहिजे असे ते म्हणाले, एकीकडे रब्बी हंगाम धोक्यात गेलेला आहे शेतकरी संकटात आहे म्हणून शेतकऱ्यांना आधार घ्यायचा असेल तर कर्जमुक्ती केली पाहिजे असे ते म्हणाले, सध्या सध्या नागपूर अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात झगडला पाहिजे मात्र तो इतर विषय घेऊन बोलत आहे. वास्तविक पाहता त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बोलले पाहिजे विरोधी पक्ष बेजबाबदारपणे वागत असल्याचा आरोपही शेट्टी यांनी यावेळी केला.
































































