राखी आता ‘तसले’ सीन देणार नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूडची आयटम गर्ल राखी सावंतने गेल्या महिन्यात एका एनआरआय व्यक्तीसोबत लग्न केले आहे. लग्नानंतर राखी अत्यंत पतीव्रता झाली असून तिचा पती रितेश याला इंटिमेट सिन आवडत नसल्याने ती आता चित्रपटात तसले सीन देणार नसल्याचे तिने सांगितले आहे. राखीने स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत याबाबत सांगितले आहे.

‘मी स्वत:ला भाग्यवान समजते की मला रितेश सारखा हँडसम नवरा मिळाला आहे. तो जगात सर्वात सुंदर आहे. त्याच्यासाठी आता मी जेवण बनवायला देखील शिकत आहे. मला लग्नानंतर चित्रपटाच्या व वेबसिरीजच्या ऑफर आल्या मात्र त्यांना मी बोल्ड, इंटिमेट सिन देणं अपेक्षित आहे. मात्र रितेशला ते आवडत नाही. त्यामुळे आता मी इंटिमेट सिन देणार नाही. तसेच तोकडे व बोल्ड कपडेही घालणार नाही’, असे राखीने या मुलाखतीत सांगितले.