
डेरा सच्चा सौदा प्रमुख आणि बलात्कार प्रकरणातील दोषी गुरमीत राम रहीम सिंहला 50 दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. गेल्या वर्षी 21 नोव्हेंबरला 21 दिवसांची सुट्टी मिळाली होती. अवघ्या दोन महिन्यांत पॅरोल मिळाला आहे. राम रहीम सध्या हरयाणाच्या रोहतक जिह्यातील सुनारिया कारागृहात बंद आहे. राम रहीम दोन महिला अनुयायींवर बलात्कार केल्या प्रकरणी 20 वर्षांची शिक्षा भोगत आहे. राम रहीमला 30 जुलै 2023लासुद्धा 30 दिवसांचा पॅरोल मिळाला होता. तसेच गेल्या वर्षी जानेवारीत 40 दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला होता. ऑक्टोबर 2022मध्ये 40 दिवसांचा तर जून 2022मध्ये 30 दिवसांचा पॅरोल मिळाला होता.

























































