राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त काढणाऱ्या पुजाऱ्याला मिळताहेत धमक्या

1759

राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या सोहळ्याला आता अवघे काही तास उरले आहेत. सगळी अयोध्या नगरी सजवण्यात आली असून अवघ्या देशाच्या नजरा या सोहळ्याकडे लागल्या आहेत. दरम्यान, या भूमिपूजनाचा मुहूर्त काढणाऱ्या पुजाऱ्याला धमक्या मिळत असल्याचं वृत्त आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचा मुहूर्त बेळगाव येथील एका पुजाऱ्याने काढला होता. त्यानंतर या पुजाऱ्याला देशाच्या विविध भागातून धमक्या येत असल्याचं वृत्त आहे. या प्रकरणी पुजाऱ्याचं नाव उघड होऊ नये, यासाठी कोणतीही अधिकृत तक्रार नोंदवण्यात आलेली नाही. पण, या पुजाऱ्याला स्थानिक पोलिसांकडून संरक्षण देण्यात आलं आहे.

दुसरीकडे, संत आणि ज्योतिषांनी या मुहूर्ताला विरोध केला आहे. काशी येथील संत, ज्योतिषी यांनीही या मुहूर्तावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे शिष्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून 5 ऑगस्ट हा दिवस भूमिपूजनासाठी अशुभ असल्याचं म्हटलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या