
अयोध्येत भूमिपूजनाने हिंदुत्वविरोधी दहशतवादी संघटनांना चांगलीच चपराक बसली. ते सूडाने पेटले आहेत. आयएसआयएस (इसिस) या दहशतवादी संघटनेने तर अयोध्येवर हल्ला करण्याचा कट रचला होता. या संघटनेच्या एका दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक करून तो उधळून लावला. या दहशतवाद्याकडे शक्तीशाली आयईडी स्फोटके भरलेला प्रेशर कुकर सापडला. दिल्लीत आत्मघातील हल्ला करण्याची योजना होती.
दिल्लीतील अनेक महत्वाच्या ठिकाणांची त्याने रेकी केली होती. 15 ऑगस्टच्या दिवशीच आत्मघाती हल्ला करण्याची त्याची योजना होती. त्यासाठी त्याने सुसाईड बॉम्बर जॅकेटही तयार केले होते. परंतु कडक सुरक्षा व्यवस्थेमुळे तो अपयशी ठरला. 36 वर्षांच्या अबू युसूफला अफगाणिस्तानातील खुरासान भागातून इसीसकडून आदेश मिळत होते. कश्मीरमधील इसीसच्या दहशतवाद्यांच्याही तो संपर्कात होता अशी माहिती चौकशीत उघड झाली.
अबू युसूफ हा मूळचा उत्तर प्रदेशातील बलरामपूरमधील भैंसाही गावचा रहिवासी आहे. गावात त्याचे सौंदर्य प्रसाधनांचे दुकान आहे. तो इसीसमध्ये सामील झाला होता. त्याचे कुटुंबीय त्याच गावात राहतात अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. दिल्ली पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने अबूच्या संपर्कात असलेल्या त्याच्या गावातीलच मुस्तकीम याचे घरही सील केले आहे. मुस्तकीम हा फरार झाला आहे.
– अबू युसूफ असे या दहशतवाद्याचे नाव आहे. दिल्लीच्या धौला कुआ आणि करोलबाग दरम्यान असलेल्या रिज रोडवर बुध्दा जयंती पार्कजवळ शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पोलिसांनी त्याला अटक केली. तत्पूर्वी त्याची पोलिसांबरोबर चकमक झाली. त्यावेळी त्याने पोलिसांवर गोळीबार करण्याचाही प्रयत्न केला. पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला.
ह इसीसचे दहशतवादी देशात सक्रीय आहेत. गेल्या 9 जानेवारी रोजी दिल्लीमध्येच तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. स्वातंत्र्यदिनी घातपात करण्याचा त्यांचा कट होता. गेल्या सोमवारी एनआयएने रहमान नावाच्या एका डॉक्टरला अटक केली. त्याचा इसीसशी संबंध असल्याचा आरोप आहे.



























































