हे पर्व सुख, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ‘ईद’च्या शुभेच्छा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुस्लिम बांधवांच्या पवित्र अशा रमजान ईद अर्थात ईद-उल-फित्रनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

दयाभाव आणि दातृत्व यांचे महत्त्व सांगणारा हा सण आहे. सामाजिक बांधीलकी जपण्याचा संदेश देणारे हे पर्व सर्वांच्या जीवनात सुख, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबईत कडेकोट बंदोबस्त

ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. शहरात सलोख्याचे वातावरण अबाधित ठेवावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.  पोलिसांच्या जोडीला एसआरपीएफचे प्लाटून्स, जलद प्रतिसाद पथके, होमगार्ड बंदोबस्तासाठी ठेवण्यात येणार आहेत.