‘रामायण’ चित्रपटातील रणबीर कपूरचा ‘रामा’वतार

रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट रामायणाचा पहिला लूकचा पोस्टर प्रदर्शित झाले आहे. त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. प्रदर्शित झालेल्या या पहिल्या लूक पोस्टरमध्ये रणबीर कपूर राम अवतारात दिसत आहे. धनुष्य हाती घेऊन, योद्ध्याच्या रूपात रणबीर कपूर या चित्रपटामध्ये दिसत आहे.

पहिल्या लूकच्या टीझर व्हिडिओमध्ये रणबीर कपूर आणि यश जंगलातील झाडावर चढताना आणि धनुष्यबाण मारताना दिसत आहे. सोशल मीडियावर चाहते रणबीर आणि यशला खूप पसंत करण्यात आले आहे. चित्रपटात रणबीर कपूर रामाची भूमिका साकारत असल्याने, रणबीरच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. त्याचबरोबर चित्रपटात साई पल्लवी सीतेची भूमिका साकारत आहे. चित्रपटाचा पहिला भाग 2026 मध्ये प्रदर्शित होईल. दुसरा भाग 2027 मध्ये प्रदर्शित होईल.

रणबीर कपूर आणि साई पल्लवी व्यतिरिक्त या चित्रपटात सनी देओल, यश, रवी दुबे असे स्टार आहेत. सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत आहे. यश रावणाच्या भूमिकेत आहे. रवी दुबे लक्ष्मण आहे. रकुल प्रीत सिंह शूर्पणखाच्या भूमिकेत आहे. काजल अग्रवाल मंदोदरीची भूमिका साकारत आहे. लारा दत्ता कैकेयीच्या भूमिकेत आहे.