रामलीला मैदानात उद्या शेतकऱ्यांचा एल्गार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेतमालाला किमान हमीभाव आणि विविध मागण्यांसाठी खानौरी आणि शंभू बॉर्डरवर ठाण मांडून बसलेले शेतकरी आणखी आक्रमक होणार आहे. येत्या 14 मार्चला रामलीला मैदानात शेतकऱयांची महापंचायत भरणार असून त्यासाठी दिल्ली पोलिसांनी परवानगी दिल्याचे संयुक्त किसान मोर्चाने म्हटले आहे. दिल्लीच्या सीमा खिळे, सिमेंट काँक्रीट आणि तारांचे पुंपण करून शेतकऱयांना अडवणाऱया मोदी सरकारविरोधात संघर्ष आणखी तीव्र करण्याचा संकल्प या महापंचायतीत सोडणार असल्याचे शेतकरी संघटनांनी म्हटले आहे.

दिल्ली पोलिसांनी रामलीला मैदानात शेतकऱयांना महापंचायत भरवण्याची परवानगी दिली असून पार्पिंगसाठी जागा तसेच पाणी, शौचालय, रुग्णवाहिका आणि दिल्ली महापालिकेचे सहकार्य मिळेल असे आश्वासनही दिल्ली पोलिसांनी दिल्याचा दावा संयुक्त किसान मोर्चाने केला आहे. रामलीला मैदानात 14 मार्चला भरणाऱया किसान मजदूर महापंचायतीत प्रचंड संख्येने शेतकरी आणि शेतमजुरांनी सहभागी व्हावे आणि मोदी सरकारला शेतकऱयांची एकजूट दाखवून द्यावी, असे आवाहन संयुक्त किसान मोर्चाने केले आहे.

मोदी सरकारच्या हुकूमशाहीविरोधात उठणार आवाज
मोदी सरकारच्या उद्योजकांची बाजू घेणाऱया, हुकूमशाही आणि जातीयवादी धोरणांविरोधात एकजुटीने आवाज उठवण्याचा संकल्पही महापंचायतीत सोडण्यात येणार असल्याचे शेतकरी संघटनांनी म्हटले आहे. शेतकरी शेती वाचवण्यासाठी, अन्नसुरक्षेसाठी आणि जगण्यासाठी तसेच लोकांची उद्योजकांकडून होणारी लूट थांबवण्यासाठी शेतकऱयांचा हा लढा असून हा लढा आणखी तीव्र करणार असल्याचे संयुक्त किसान मोर्चाने म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीत धडा शिकवणार
आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारला धडा शिकवण्याच्या दृष्टीने महापंचायतीत शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहेत. या महापंचायतीत ट्रेन, बस, चारचाकी गाडय़ा मिळेल त्या वाहनांमधून आजूबाजूच्या राज्यांमधून मोठय़ा संख्येने शेतकऱयांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. वाहनांना लावण्यात येणारे स्टीकर्स, झेंडे यांचा पुरवठा करण्यात येईल असेही शेतकरी संघटनांनी म्हटले आहे. दरम्यान, दिल्लीपर्यंत शेतकऱयांना विनाअडथळा प्रवास करता येईल आणि वाहने पार्क करण्यासाठी काही जागा नेमून दिल्या जातील, असे आश्वासनही दिल्ली पोलिसांनी दिल्याचा दावा शेतकरी संघटनांनी केला आहे.