रणवीर सिंह छोटय़ा पडद्यावर!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूडचा एनर्जेटिक अभिनेता रणवीर सिंह आता छोटय़ा पडद्यावर आपल्या नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार लवकरच तो एका टीव्ही रियालिटी शोमध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. कलर्स वाहिनीवरील येणाऱया या शोचं नाव ‘न्यू बिग रियालिटी सिरीज’ असल्याचं कळतंय. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. हा क्विझ शो असून त्यात 12 राऊंड असतील. जिंकणाऱया विजेत्याला 5 कोटी रुपयांचे बक्षीस मिळेल. स्पर्धकाला 3 लाईफलाईन मिळतील. एकंदरीत केबीसीच्या धर्तीवर हा शो असल्याची चर्चा आहे. मात्र खरं काय ते शो ऑन एअर झाल्यावरच कळेल. 26 एपिसोडचा हा शो जुलै महिन्यात भेटीला येणार आहे. आता छोटय़ा पडद्यावर रणवीर काय कमाल दाखवतोय हे येणाऱया काळात स्पष्ट होईल. वर्क प्रंटबाबत बोलायचे तर आगामी काळात तो ‘सर्कस’ आणि ‘83’ या चित्रपटांत झळकणार आहे.