
रणबीर कपूर आणि आलिया भट हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांनीही जाहिरपणे अनेकदा त्यांच्या प्रेमाची कबूली दिली आहे. त्यामुळे ही क्यूट जोडी कधी लग्न करणार असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला होता. अखेर त्यांच्या चाहत्यांना रणबीरने एक खूषखबर दिली आहे. लवकरच तो आलियासोबत लग्न करणार असल्याचे त्याने जाहीर केले आहे.
रणबीर सांगतो की, ‘लॉकडाऊनचा वेळ आम्ही एकमेकांसोबत घालवला. त्यामुळे आणखी जास्त आम्ही एकमेकांना समजू लागलो. आलिया फार महत्वाकांक्षी आहे. तिला नवनवीन शिकायला आवडतं. ती या काळात गिटार शिकली. लेखन केले. नवीन गोष्टी शिकून वेळ सत्कारणी लावला. मधल्या काळात आम्ही कौटुंबिक अडचणींचा सामना करत होतो. कुटुंबासोबत वेळ घालवू लागलो. दिवसाला दोन-तीन चित्रपट पाहायचो, लॉकडाऊन झाला नसता तर आतापर्यंत मी आणि आलिया विवाहीत असतो’, असे रणबीरने सांगितले.
रणवीर आणि आलिया पहिल्यांदाच अयान मुखर्जी यांच्या ‘ब्रम्हास्र’ चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन, नागार्जुन, डिंपल कपाडीया हे कलाकार असणार आहेत. शूटींगदरम्यानचे अनेक फोटो या दोघांनीही त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केलेले आहेत.



























































