रामायणम् चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच कमावले इतके करोड, वाचा

काही दिवसांपूर्वीच रणबीर कपूर प्रमुख भूमिकेत असलेल्या ‘रामायणम्’ या चित्रपटामधील रणबीरचा लूक पाहायला मिळाला. रणबीर कपूरचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. नमित मल्होत्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, याचा ट्रेलर पाहिल्यापासूनच प्रेक्षकांच्या मनात कुतूहल दाटून आले आहे.

रणबीर कपूर हा पहिल्यांदाच श्री रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. एकीकडे रणबीरची चर्चा तर दुसरीकडे, यशने साकारलेला रावणही प्रेक्षकांच्या मनपसंतीस उतरला. चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाबद्दल प्रचंड चर्चा झाली. याचाच मोठा फायदा आता प्रॉडक्शन हाऊसला झालेला आहे.

नमित मल्होत्राने प्राइम फोकस स्टुडिओ अंतर्गत ‘रामायणम्’ या चि निर्मिती केली आहे. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार, प्राइम फोकस बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर आहे. रणबीरच्या पहिल्या लूकनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 30 टक्के वाढ झाली. 25 जून ते 1 जुलै दरम्यान त्यांच्या शेअर्सची किंमत 113.47 रुपयांवरून 149.69 रुपयांवर पोहोचली. पण ‘रामायणम्’च्या पहिल्या टिझरने नमित मल्होत्राच्या कंपनीला घसघशीत नफा प्राप्त झालेला आहे.

3 जुलैला ट्रेलर लाॅंच झाल्यानंतर, ‘रामायणम्’ बद्दल सोशल माध्यमावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. 3 जुलैला कंपनीच्या शेअरची किंमत 176 रुपयांवर गेली होती. अहवालानुसार, कंपनीचे मार्केट कॅप 4638 कोटी रुपये होते. पुढच्या दोन दिवसात याची किंमत 5641 कोटी रुपये झाली. ‘रामायणम्’ मधील रणबीरच्या पहिल्या लूकनंतर कंपनीला 1000 कोटी रुपयांचा नफा झाला.

‘रामायण’ चित्रपटातील रणबीर कपूरचा ‘रामा’वतार

प्राइम फोकस स्टुडिओमध्ये गुंतवणूकदार असल्याचे समजते. बिझनेस टुडेने दिलेल्या बातमीनुसार, रणबीर या कंपनीच्या 1.25 दशलक्ष शेअर्सचा मालक होणार आहे. या शेअर्सचा बाजारभाव सुमारे 20 कोटी इतका आहे.

रणबीर कपूरसोबत यश, साई पल्लवी, सनी देओल आणि रवी दुबे हे कलाकार ‘रामायण’ चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट दोन भागात बनवला जात आहे. त्याचा पहिला भाग 2026 च्या दिवाळीला आणि दुसरा भाग 2027 च्या दिवाळीला प्रदर्शित होईल. ए.आर. रहमानसह दिग्गज संगीतकार हंस झिमर यांनी चित्रपटात संगीत दिले आहे.