लॅंड रोव्हरने आणली ऑफ रोड एसयूव्ही, किंमत 74 लाख

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ब्रिटीश ऑटोमोबाईल कंपनी लॅंड रोव्हरने ऑफ रोड सेगमेंटमधली डिफेंडर ही एसयूव्ही कार लॉंच केली आहे. हिंदुस्थानात या कारच्या बेसिक मॉडेलची एक्स शोरूम किंमत 74 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची किंमत 90 लाख रुपये आहे. या कारची स्पर्धा जिप रेंगलरसोबत असणार आहे. ही ऑफ रोड एसयूव्ही कंपनीने 3 डोअर आणि 5 डोअर या दोन प्रकारांत उपलब्ध आहे. हिंदुस्थानात कंपनीने बेस, एस, एसई, एचएसई आणि फर्स्ट एडिशन हे मॉडेल्स बाजारात आणले आहे. 2.0 लीटर ट्रबो चार्ज्ड फोर सिलिंडर पेट्रोल इंजिन, 8 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, राऊंड हेडलाईट्स आदी कारची वैशिष्टय़े आहेत.