चिंचपोकळी येथे रांगोळी प्रदर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विद्यार्थ्यांनी साकारलेल्या अप्रतिम व्यक्तिचित्रण रांगोळ्यांचे प्रदर्शन पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे. हे प्रदर्शन 2 नोव्हेंबरपासून सुरू झाले असून 5 नोव्हेंबरपर्यंत सकाळी 10 ते 1 आणि सायंकाळी 6 ते 9 या वेळेत चिंचपोकळी पूर्व येथील श्री विजयश्री आर्ट स्कूल, रूम नंबर 1 येथे पाहता येईल. हे प्रदर्शन विनामूल्य असून अधिकाधिक कलाप्रेमींनी प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.