
सामना प्रतिनिधी । कुडाळ
कुडाळ बाजारपेठ येथील श्री देव मारूती नगर ब्राम्हण मंदिरात संजय नेवगी (नेरूर) व ओंकार मडवळ (हिंदु कॉलनी-कुडाळ) यांनी रेखाटलेली रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. कार्तिक पौर्णिमेला या मंदीरातील काकड आरतीला 35 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने श्री मारूती रामाच्या रूपात ही रांगोळी काढण्यात आली आहे. वाळु, रांगोळी व फुलांचा वापर करून काढण्यात आलेल्या या रांगोळीकडे सर्वांचे लक्ष केंद्रीत होत आहे.





























































