इतकं मारेन की, तुझ्या चेहऱ्यावरून वयही कळणार नाही! राणी मुखर्जी संतापली, पाहा व्हिडीओ

3072

बॉलिवूडची बबली राणी मुखर्जी सध्या मोठ्या पडद्यापासून दूर आहे. आदित्य चोप्राशी विवाहबद्ध झाल्यानंतर ती तिची मुलगी अदिरा हिच्या संगोपनात गढून गेली आहे. गेल्या वर्षी तिचा हिचकी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर तो बऱ्यापैकी चालला. पण, त्यानंतर राणी फारशी प्रसारमाध्यमांसमोर आलेली दिसली नाही. पण, आता पुन्हा एकदा राणी मुखर्जी चर्चेत आली आहे. त्याला कारण आहे ती तिने दिलेली धमकी.

हिचकीनंतर प्रसिद्धीपासून दूर असलेली राणी सध्या तिच्या आगामी चित्रपटात व्यग्र आहे. 2014मध्ये आलेल्या राणीच्या मर्दानी या चित्रपटाने चांगलं यश मिळवलं होतं. देहविक्रयाच्या जाळ्यात ओढल्या जाणाऱ्या किशोरवयीन मुली हा या चित्रपटाचा विषय होता. त्यात राणीने साकारलेली शिवानी शिवाजी रॉय ही व्यक्तिरेखा सगळ्यांच्या चांगलीच लक्षात राहिली होती. आता या चित्रपटाचा पुढचा भाग ‘मर्दानी 2’ हा प्रदर्शित होणार आहे.

याच चित्रपटासंबंधी तिची एक धमकी व्हायरल होताना दिसत आहे. पण ही धमकी प्रत्यक्षातली नसून रिल म्हणजे चित्रपटातली आहे. निमित्त आहे ते राणी मुखर्जीच्या आगामी ‘मर्दानी 2’ या चित्रपटाच्या टीझरचं. इन्स्पेक्टर शिवानी आता मुंबई पोलिसात नसून ती उत्तर प्रदेश पोलिसात असलेली दिसत आहे. टीझरमध्येच ती, मुलीला हात लावलास तर इतकं मारेन की तुझ्या त्वचेवरून वयसुद्धा कळणार नाही, अशी धमकी देताना दिसत आहे. त्यावरून हा चित्रपटही स्त्रियांवरील अत्याचारांना दाखवणारा असेल, असा अंदाज येत आहे. यशराजची निर्मिती असलेला आणि गोपी पुथरन यांनी दिग्दर्शित केलेला ‘मर्दानी 2’ हा चित्रपट येत्या 13 डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

पाहा व्हिडीओ-

आपली प्रतिक्रिया द्या