
मला माझी मुलगी आदिराला वेगवेगळय़ा भाषा शिकवायच्या आहेत. जेणेकरून ती जगाच्या पाठीवर कुठेही गेली तरी तिला त्या भाषेत संवाद साधता येईल. ती मराठीदेखील शिकतेय. कारण आपण महाराष्ट्रात राहतो, त्यामुळे तिला ही भाषा येणे सर्वात महत्त्वाचे आहे, असे विधान बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जी हिने केले आहे.
अभिनेत्री राणी मुखर्जी सध्या तिच्या ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय. अलीकडेच ती करिना कपूरच्या ‘व्हॉट वुमन वाँट’ या शोमध्ये दिसली होती. यावेळी करिनाने तिला आदिराच्या शिक्षणाबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना आदिराबद्दल ती भरभरून बोलली. ‘आदिरा खूप हुशार आहे, ती शाळेत इंग्रजीसोबतच हिंदीदेखील शिकतेय. खरं तर ती तिच्या वर्गातली एकमेव मुलगी आहे जी चांगली हिंदी बोलते’, असेही राणी म्हणाली.




























































