
के. एल. राहुलच्या झुंजार 130 धावांच्या खेळीच्या जोरावर कर्नाटकने 325 धावांचे आव्हान पार करत मुंबईचा रणजी स्पर्धेतील खेळ खल्लास केला आणि उपांत्य फेरीत धडक मारली. वांद्रे-कुर्ला संकुलातील शरद पवार अकादमीत रंगलेल्या या थरारक लढतीत कर्नाटकने 4 विकेट राखून विजय मिळवला. आता कर्नाटकचा सामना पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठणाऱया उत्तराखंडशी 15 फेब्रुवारीपासून होईल. तसेच जम्मू-काश्मिरने मध्य प्रदेशचा 56 धावांनी पराभव करत उपांत्य फेरी गाठली. बंगालने आंध्र प्रदेशविरुद्ध 334 धावांची आघाडी घेत आपलाही अंतिम चार संघातील प्रवेश जवळजवळ निश्चित केला आहे.


























































