सख्ख्या बहिणीनेच केला होता बलात्कार, अमेरिकन पॉप सिंगरचा गौप्यस्फोट

5762

आपल्या सख्ख्या बहिणीने आपल्यावर वारंवार बलात्कर केला असा गौप्यस्फोट अमेरिकेचा सुप्रसिद्ध पॉप सिंगर अॅरॉन कार्टर याने केला आहे. ट्विटवरून त्याने ही सर्व हकीगत सांगितली आहे.

लेस्ली ही दुभंगलेल्या व्यक्तिमत्वाची होती. या मानसिक आजारावर मात करण्यासाठी तिला लिथियमचे औषध दिले जात होते. या औषधोपचारांचा तिला प्रचंड राग येत होता. जेव्हा ती औषधं घ्यायची नाही तेव्हा ती अशा गोष्टी करायची ज्या तिच्याकडून कधीच अपेक्षित नसायच्या. माझ्या कुटुंबामध्ये अशा काही गोष्टी होत्या ज्या मला लोकांना कधीच सांगायच्या नव्हत्या असं अॅरॉनने म्हटलं आहे.

अॅरॉन कार्टर याची बहीण लेस्ली कार्टर हिचा अंमली पदार्थाच्या अतिसेवनामुळे 2012 साली मृत्यू झाला होता. लेल्सी दुभंगलेल्या व्यक्तीमत्वाची होती. अंमली पदार्थाच्या आहारी गेली होती. अॅरॉन जेव्हा 10 वर्षाचा होता तेव्हा लेस्लीने आपल्यावर वारंवार बलात्कार केला असे अॅरॉनने म्हटले आहे. लेस्लीवर ड्रग सोडण्यासाठी उपचार सुरू होते. जेव्हा ती औषधे घ्यायची नाही तेव्हा ती माझ्यावर बलात्कार करायची असे अॅरॉनने म्हटले आहे. वयाच्या 10 ते 13 वर्षापर्यंत आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे अॅरॉनने ट्विटवर म्हटले आहे. हे सर्व कृत्य ती नशेच्या आहारी असल्यामुळे केले असेही अॅरॉनने म्हटले आहे.

अॅरॉन हा निक कार्टर याचा लहान भाऊ आहे. निक कार्टर हा अमेरिकेतील प्रसिद्ध बँड बॅकस्ट्रीट बॉयचा सदस्य होता. निकप्रमाणे अॅरॉन हा देखील गायक आहे. या दोघांमध्ये आता ट्विटरवरून शाब्दीक युद्धाला तोंड फुटले आहे. मोठा भाऊ असलेल्या निकने लहान भावावर म्हणजे अॅरॉनवर गंभीर आरोप केला आहे. अॅरॉन हा माझ्या मुलांना आणि गर्भवती बायकोला ठार मारण्याच्या तयारीत आहे आणि मी त्याच्या भीतीने पोलीस संरक्षण मागितले आहे असं निकने म्हटले आहे. निकने अॅरॉनने त्याच्यावर लावलेल्या आरोपांचा इन्कार केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या