प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांविरोधात बलात्काराची तक्रार

4899

बिग बॉस 13 मधून प्रसिद्ध झालेल्या पंजाबची गायिका अभिनेत्री असलेल्या शेहनाझ गिल हिच्या वडिलांविरोधात एका 40 वर्षीय महिलेने बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. संतोक सिंग यांनी बंदुकीचा धाक दाखवत कारमध्ये तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार दाखल झाली आहे.

santok-singh

बिग बॉस च्या तेराव्या सिझनमधून शेहनाझ प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली होती. प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याच्यासोबत बिग बॉसमध्ये शेहनाझचे नाव जोडले गेले होते. त्यावरून नेटकऱ्यांनी ‘सिदनाझ’ असा हॅशटॅगही तयार केला होता. बिग बॉसच्या फॅमिली विकमध्ये शेहनाझचे वडिल संतोक सिंग यांनी घरात प्रवेश केला होता.

जालंधर येथील या महिलेला संतोक सिंग यांनी तिच्या बॉयफ्रेंडविषयी खोटे सांगून घरी बोलावले होते. त्यानंतर ती महिला जेव्हा त्यांच्या घरी गेली. त्यानंतर संतोकने काहीतरी बहाना करून तिला त्यांच्या घऱाच्या गॅरेजमध्ये नेले व तिथे बंदुकीचा धाक दाखवत तिच्यावर कारमध्ये बलात्कार केला. महिलेने पोलिसात गुन्हा दाखल केल्यापासून संतोक सिंग फरार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या