कुठे बलात्कार्‍यांना भर चौकात फाशी, तर कुठे करतात नपुंसक; वाचा सविस्तर

आज 12 डिसेंबर. बरोबर 7 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी दिल्लीतील निर्भयावर अमानुष बलात्कार झाला होता आणि नंतर काही दिवसांनी तिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण देशात खळबळ माजली होती. घटनेपासून देशात ठिकठिकाणी संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यांना तत्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी लोकांची मागणी होती. आता नुकतंच हैदराबाद मधील पशुवैद्यकीय महिलेवर बलात्कार करून आरोपींनी पीडितेला जिवंत जाळले होते. तेव्हाही त्यांना तत्काळ मारले पाहिजे अशी जनभावना निर्माण झाली होती. असे असतनाच हैदराबादच्या पोलिसांकडून त्यांचा एन्काऊंटर झाला. यामुळे सामान्य नागरिकांनी एकच जल्लोष व्यक्त केला. देशातील जिथे जिथे अशा अमानुष पद्धतीने बलात्कार होतात तिथे अशाच प्रकारची देहांत शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात झाली आहे. निर्भया प्रकरणाला सात वर्ष झाली. आरोपींना फाशीच्या शिक्षेची सुनावणीही झाली आहे. तरी त्याची अंमलबजावणी झाली नाहिये. अशा वेळेला इतर देशातील कायदा आपल्याकडे लागू करण्याची मागणी नागरिकांकडून होत असतो. विशेषतः मुस्लिम राष्ट्रांमध्ये ज्या प्रकारे गुन्हेगाराला शिक्षा दिली जाते तशीच शिक्षा का दिली जात नाही असा संतप्त सवालही विचारला जातो.

या पार्श्वभुमीवर आणि विविध देशातील बलात्काराच्या आरोपींना काय शिक्षा दिली जाते याचा आढावा घेऊया.

सर्वात प्रथम मुस्लिम राष्ट्रांच्या कायद्यातील तरतूदी पाहुया. बहुतांश मुस्लिम किंवा अरब राष्ट्रांमधील बलात्कारी आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते.

सौदी अरेबिया देशात आरोप सिद्ध झाल्यानंतर आरोपीचा शिरच्छेद केला जातो. इजिप्त देशात आरोपीला भर चौकात फसावर लटकले जाते. इराणमध्येही आरोपीला फाशीची शिक्षा दिली जाते तसेच जमावकडून दगड मारून त्याचा जीव घेतला जातो. अफगाणिस्तानमध्ये चार दिवसांत निकाल लावला जातो. आरोपीला फाशी दिली जाते किंवा गोळ्या घालून ठार केले जाते. बांग्लादेश आणि पाकिस्तानमध्येही आरोपीला फाशीची शिक्षा दिली जाते. उत्तर कोरिया सारख्या हुकुमशहा देशात गोळ्या घालून आरोपीला ठार केले जाते.

युरोप खंडातील देशात मानवाधिकारांना खूप महत्त्वाच मानले जाते. म्हणून बलात्कारातील आरोपींना काही वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली जाते. त्यात फ्रान्स, स्विर्त्झलँड, स्कॉटलँड, जर्मनी तसेच इंग्लंडमध्येही फक्त आरोपीला काही वर्षांची शिक्षा किंवा जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाते. रशियामध्येही बलात्काराच्या आरोपीला जास्तीत जास्त 20 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली जाते.

युरोप खंडातील पोलंड देश या शिक्षेसाठी अपवाद आहे. पोलंडमध्ये आरोपीला रासायनिक प्रक्रिया करून नपुंसक केले जाते.

असे असताना असे अनेक देश आहेत जिथे बलात्कार पीडितेचे आरोपीशीच लग्न लावून दिले जाते. आजही असे कायदे अनेक देशात राबवले जाते, त्यात पीडितीचे पुनर्वसन आणि आरोपीला शिक्षा या दोन्ही साध्य केल्या जातात असा समज या कायद्यामागे असतो. बाहरीन, इटली, जॉर्डन, लिबिया, मलेशिया, पॅलेस्टाईन, उरुग्वे, सर्बिया, तझाकिस्तान सारख्या देशात पीडित मुलीचे लग्न आरोपी व्यक्तींशी केले जाते.

अमेरिकेत एकूण 50 राज्य आहेत. बहुतांश राज्यात बलात्कारी आरोपींना कारावासाची शिक्षा दिली जाते. परंतु 10-11 राज्यात आरोपींची शस्त्रक्रिया करून त्यांना नपुंसक बनवले जाते.

आपली प्रतिक्रिया द्या