मुरुड येथे पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार; युवकावर गुन्हा दाखल

2438

लातूर जिल्ह्यातील मुरुड येथील पारू नगर भागात पाच वर्षाच्या मुलीवर एका नराधमाने बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन एका युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत मुलीच्या घरी सातत्याने येणाऱ्या अक्षय महावीर बीडकर या युवकाने 24 तारखेला मुलीवर बलात्कार केला. ही घटना कोणालाही सांगितली तर शाळेतील सरांना सांगून तुला मारायला लावेन, अशी भीती त्याने मुलीला दाखवली. पिडीत मुलीला त्रास होत असल्याने तिने ही घटना दुसऱ्या दिवशी आईला सांगितली. त्यानंतर पिडीत मुलीच्या आईने मुरुड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन अक्षय महावीर बीडकर याच्याविरुध्द बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा व कलम 376 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या