
हैदराबादमधील बलात्कार आणि आमानुष हत्याकांडाने संपूर्ण देशात संतापाचा उद्रेक झाला असताना उत्तर प्रदेशमध्ये एका 70 वर्षाच्या वृद्धेवर बलात्कार झाला आहे. या प्रकरणी आरोपीला अटक केली असून पीडित वृद्ध महिलेवर इस्पितळात उपचार सुरू आहेत.
पीडित महिलेच्या नातवाने दिलेल्या माहितीनुसार त्याची आजी आजारी असायची. त्यामुळे ती घरीच आराम करायची. एक डिसेंबर रोजी सायंकाळी 8 वाजता घरी कोणी नसताना एक नराधम घरी घुसला आणि त्याने आजीवर बलात्कार करून पळून गेला.
नातवाने तातडीने पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी शोध घेत नराधम आरोपीला अटक केली. तसेच पीडित महिलेला इस्पितळात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
























































