लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माहेरी आलेल्या विवाहितेस लग्नाचे अमिष दाखवून मनोज पवार याने विवाहितेवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. तसेच अश्‍लील फोटो सासरच्यांना दाखवतो, अशी धमकी देत त्याने दिल्याने कोपरगाव ग्रामिण पोलीस ठाण्यात मनोज पवारविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, आपण सासरी आंबेडकर चौक मनमाड (ता.नांदगांव जि.नाशिक) येथे नांदत असताना समोरच रहाणार्‍या मनोज गणेश पवार याचेशी विवाहितेची जवळीक वाढली. त्याने तिचे अंघोळीचे अश्‍लील फोटो काढले. या फोटोचा धाक दाखवून तू माझ्याशी शरीरसंबंध ठेव नाहीतर फोटो तुझ्या सासरकडील लोकांना दाखवतो असे धमकावले. पीडित महिला सुरेगाव येथे माहेरी आली असता तिला लग्नाचे अमिष दाखवून आरोपीने तिच्यावर शिर्डी, नगर, आळेफाटा अशा विविध ठिकाणी लॉजवर नेत अत्याचार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे पुढील तपास करीत आहेत.