उत्तर प्रदेशमध्ये सहावीच्या विद्यार्थिनीवर सामुहिक बलात्कार, गरोदर झाल्यामुळे समोर आली घटना

उत्तर प्रदेशच्या अमेठी जिल्ह्यात सहावीच्या विद्यार्थिनीवर सामुहिक बलात्कार झाला आहे. मुलगी गरोदर झाल्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली आहे.

विद्यार्थिनी शौचायलयाला जात होती. तेव्हा दोन तरुणांनी तिचे अपहरण केले. दोन्ही तरुण तिच्यावर जेव्हा जबरदस्ती करत होते तेव्हा तिने विरोध केला. तेव्हा नराधमांनी तिला मारहाण केली आणि तिच्यावर बलात्कार केला. तसेच याबाबत कुठे वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकीही दिली. नंतर काही दिवसांनी पीडित मुलीच्या पोटात दुखायला लागले. घरच्यांनी तिला डॉक्टरकडे नेले असता ती गरोदर असल्याचे समोर आले. तेव्हा मुलीने झाली हकीगत सांगितली. या प्रकरणी दोन्ही नराधमांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या