12 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या माजी आमदाराला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

12 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या माजी आमदाराला अखेर अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. नानजील मुरुगेसन असं या आरोपीचं नाव असून तो 53 वर्षांचा आहे. मुरुगेसन अटकेच्या भीतीने फरार झाला होता. त्याला शोधून काढण्यासाठी पोलिसांनी 5 पथके तैनात केली होती. तिरुनेलवेली जिल्ह्यातील उवारी आणि थिसायानविलाई गावांमध्ये तो कुठेतरी लपून बसला असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. अखेर बुधवारी त्याला अटक करण्यात आली.

World News Photo – जगभरातील काही महत्वाच्या बातम्या वाचा फक्त 8 सेकंदात

या प्रकरणी पोलिसांनी यापूर्वी 4 जणांना अटक केली असून यामध्ये पीडित मुलीच्या आईचाही समावेश आहे. पॉल (वय- 66 वर्षे), अशोक कुमार (वय- 43 वर्षे) आणि कार्तिक (वय-28 वर्षे) अशी अटक केलेल्या इतर आरोपींची नावे आहेत मुरुगेसन आणि या अन्य आरोपींनी पीडित मुलीवर अनेकदा बलात्कार केला होता. हे सगळं मुलीच्या आईच्या संमतीने झालं असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली होती, ज्यामुळे तिलाही अटक करण्यात आली होती.

नीट बोलत नाही म्हणून मुलीचा खून केला, क्राईम सिरीयल पाहून रचला हत्येचा डाव

मुरुगेसन हा AIADMK पक्षाचा 2011 ते 2016 या काळात नागरकोईलचा आमदार होता. त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाल्याचे कळाल्यानंतर सोमवारी त्याला पक्षातून हाकलून देण्यात आले होते. पीडीत मुलगी 20 वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली होती आणि दोघे पळून गेले होते. या तरुणाच्या विरोधात पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून दोघांना पकडलं होतं. जेव्हा या मुलीला पोलिसांनी न्यायालयासमोर उभं केलं तेव्हा तिने तिच्यासोबत घडलेला प्रकार न्यायाधीशांना सांगितला.

या मुलीने सांगितलं की तिच्या आईसोबत मुरुगेसनचे अनैतिक संबंध होते. आपल्यावर मुरुगेसनने 2017 साली बलात्कार केला होता असंही तिने सांगितलं. हे प्रकरण न्यायालयाने जिल्हा बालविकास समितीकडे सोपवलं. यानंर या प्रकरणी नागरकोईल इथल्या महिला पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दाखल करण्यात आली आणि तपास सुरू करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर मुरुगेसन ताबडतोब फरार झाला होता.