‘चोर आले बघा पन्नास खोके घेऊन…!’ मिंध्यांच्या गद्दारीची लक्तरे टांगणारा रॅपर राज मुंगासेच्या विरोधात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘चोर आले बघा पन्नास खोके घेऊन…’ या रॅपने मिंध्यांच्या गद्दारीची लक्तरे महाराष्ट्राच्या वेशीवर टांगणार्‍या राज मुंगासे याच्या विरोधात अंबरनाथ येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, राज मुंगासे याला छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी अटक केली असून, त्याला अंबरनाथ पोलिसांकडे सोपवण्यात येईल, असे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

काही महिन्यांपूर्वी शिवसेनेशी गद्दारी करून मिंध्यांच्या म्होरकेगिरीत ४० जण बाहेर पडले. ही गद्दारी तेव्हापासून महाराष्ट्रात संतापाचा आणि चेष्टेचा विषय बनली आहे. मिंध्यांच्या गद्दारीवर अनेक चारोळ्या, कविता, रॅप बनले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील राज मुंगासे या तरुणाचे ‘चोर आले बघा… पन्नास खोके घेऊन… ’ हे रॅप सध्या भलतेच गाजत आहे. सोशल मीडियावर या रॅपने धूम केली आहे. दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज मुंगासे याचे रॅप शेअर करत त्याच्यावर पोलीस कारवाई करतील, अशी भीती व्यक्त केली होती.

मिंधे गटाच्या स्नेहल दिलीप कांबळे यांनी रॅप बदनामी करणारे असल्याचा कांगावा करत ठाणे जिल्ह्याच्या अंबरनाथ भागात असलेल्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी या तक्रारीवरून भादंविच्या कलम ५०१, ५०४ तसेच ५०५ (२) अन्वये राज मुंगासे याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी, आम्ही तपास करत आहोत. सायबर गुन्हे शाखेची यासाठी मदत घेण्यात येत आहे. मात्र या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले.

छत्रपती संभाजीनगरातील पोलिसांचे मौन

राज मुंगासेला छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याला अंबरनाथ पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. यासंदर्भात छत्रपती संभाजीनगर पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी कानावर हात ठेवले. आम्ही कुणालाही ताब्यात घेतले नाही, असे सांगून या पोलिसांनी हात वर केले.

हे आहे ते रॅप…

चोर आले पन्नास खोके घेऊन
किती बघा चोर आले
एकदम ओके होऊन
कसे बघा पन्नास खोके घेऊन
किती बघा चोर आले…
एकदम ओके होऊन…

अरे छक्क्यांच्या मिशीला ताव बघा
यांनी पाटीवर दिला आपल्या घाव बघा
गेले सुरत, गुवाहाटी आणि गोवा कसे
ढोसली दारू अन् मांडला हा डाव बघा
अरे पळकुटे चोर साले छाती म्हणे ५६
चोरलाय पक्ष आता चोरतील बाप पण
अळ्या पडून मरतील महाराष्ट्राचा श्राप आहे
मराठी माणूस या सगळ्यांचा बाप आहे

चोर आले पन्नास खोके घेऊन

आपले प्रकल्प पळवले गुजरातला या साल्यांनी
महाराष्ट्र विकला या भडव्या दलालांनी
सत्तेसाठी झुकले हे दिल्लीला जाऊन
शिवरायांचं नाव कसं घेतल आईघाल्यांनी
जाळू यांची लंका आणि दावू यांना इंगा
भोगा कर्माची फळे घेतला आहे पंगा
खूप फिरले झाडी डोंगर
दावू यांना ठेंगा
मराठी पुष्प स्वराज्य
झुकने नही दूँगा

चोर आले ५० खोके घेऊन…