फोन टॅपिंग प्रकरण- रश्मी शुक्ला यांची पुन्हा दोन तास चौकशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केल्या प्रकरणात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची कुलाबा पोलिसांनी आज दुसऱयांदा दोन तास चौकशी करून त्यांचा जबाब नोंदविण्यात आला. शिवसेना नेते खासदार संजय राऊत व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी याआधी 16 तारखेला शुक्ला यांची चौकशी झाली  होती.

गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना रश्मी शुक्ला यांनी राजकीय नेत्यांचे बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केले होते. काँग्रेस नेते नाना पटोले यांचा फोन टॅप केल्याप्रकरणी पुण्याच्या बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तर शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी अपर पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱयाच्या तक्रारीवरून कुलाबा पोलीस ठाण्यात रश्मी शुक्ला यांच्याविरोधात भारतीय टेलिग्राफ ऍक्टच्या कलम 26 तसेच भादंवि कलम 166 अन्वये गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात  चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने शुक्ला यांना दिले होते.