बळीराजावरील संकट टळू दे! रश्मी ठाकरे यांच्या हस्ते टेंभीनाक्यावरील दुर्गेश्वरीची महाआरती

माते दुर्गेश्वरी.. महाराष्ट्रातील बळीराजावर आलेले ओल्या दुष्काळाचे संकट टळू दे आणि राज्याला शांती, स्थैर्य लाभू दे, असे साकडे आज रश्मी ठाकरे यांनी अंबेमातेला घातले. त्यांनी टेंभीनाक्यावरील दुर्गेश्वरी देवीची खणा-नारळाने ओटी भरून महाआरतीदेखील केली. यावेळी अंबेमातेच्या जयजयकाराने टेंभीनाक्याचा परिसर दणाणून गेला होता.

शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांनी टेंभीनाका येथे अंबेमातेच्या नवरात्रोत्सवाचा शुभारंभ केला. यंदाचे 47 वे वर्ष असून दरवर्षी ठाकरे कुटुंबीय देवीचे दर्शन घेऊन महाआरती करतात. परंपरेनुसार रश्मी ठाकरे यांनी देवीचे दर्शन घेतले. तसेच मंत्रोच्चारात पूजा केल्यानंतर संबळाच्या तालावर ‘दुर्गे दुर्घट भारी’ ही आरती करण्यात आली. रश्मी ठाकरे यांच्या स्वागतासाठी ठाण्याच्या वेशीपासून शिवसैनिक व महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती. रश्मी ठाकरे यांनी शिवसेनेचे दिवंगत उपनेते अनंत तरे यांच्या निवासस्थानी जाऊन तेथील देवीचे दर्शन घेतले. तसेच चंदनवाडी, श्रीरंग शाखा व रामचंद्रनगर येथील नवरात्रोत्सवालादेखील भेट दिली.

याप्रसंगी शिवसेना नेते व माजी खासदार राजन विचारे, उपनेत्या किशोरी पेडणेकर, विशाखा राऊत, ज्योती ठाकरे, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, उपजिल्हाप्रमुख प्रदीप शिंदे, ओवळा-माजिवडा विधानसभा संपर्कप्रमुख नरेश मणेरा, प्रकाश पाटील, प्रवीण म्हात्रे, एम. के. मढवी, माजी नगरसेवक संजय तरे, ठाणे शहरप्रमुख अनिष गाढवे, संपर्कप्रमुख रंजना नेकाळकर, जिल्हा संघटक रेखा खोपकर, रंजना शिंत्रे, नीलम ढकण, महिला जिल्हा संघटक वैशाली दरेकर, उपजिल्हा संघटक आकांक्षा राणे, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, महेश्वरी तरे, ज्योती कोळी, ठाणे विधानसभा संघटक प्रमिला भांगे, वैशाली शिंदे, विद्या कदम, माजी महापौर स्मिता इंदुलकर, अनिता प्रभू, कळवा-मुंब्रा विधानसभा संघटक पुष्पलता भानुशाली, कल्याण ग्रामीण विभाग संघटक योगिता नाईक, कळवा समन्वयक नीलिमा शिंदे, स्नेहल सावंत, ज्योती पाटील, अंकिता पाटील, विभागप्रमुख प्रशांत सातपुते आदी उपस्थित होते.