रतन टाटा यांचा मर्सिडीझ कार चालवतानाचा फोटो व्हायरल

हिंदुस्थानी उद्योग जगतातील एक आदर्श व्यक्तीमत्व आणि टाटा उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचे कार प्रेम सर्वानाच ठाऊक आहे. पण टाटा स्वत: मर्सिडीझ एसएल 500 हि विदेशी कार स्वत: ड्राव्ह करतानाचे दुर्मिळ छायाचित्र नुकतेच व्हायरल झाले आहे. हिंदुस्थानी उद्योगजगतातील या महामानवाचे हे कार चालवतानाचे छायाचित्र मीडिया आणि सोशल साईट्सवर नागरिकांत अतिशय लोकप्रिय होत आहे. सार्वजनिक जीवनातही अतिशय साधेपणा आणि नियमांचे भान ठेवून वागणारे रतन टाटा यांच्या या छायाचित्रात कारमध्ये त्यांच्या शेजारी केवळ एक सहचालक दिसत आहे. सार्वजनिक रस्त्यावरून फिरताना आपले अंगरक्षकही टाटा यांनी सोबत घेतलेले दिसत नाहीत. हे छायाचित्र 2 ते 3 वर्षांपूर्वीचे असले तरी दानशूर रतन टाटांना मानणारे लाखो चाहत्यांनी त्यावर लाईक्स आणि शुभेच्छापर संदेशांचा पाऊस पाडला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या