
गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन हेट प्रचंड व्हायरल होत आहे. या सगळ्या संदर्भात आता प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी एक लिहिलेली पोस्ट व्हायरल होत आहे. ऑनलाईन हेट संदर्भात रतन टाटा यांनी मांडलेले विचार हे अत्यंत वेगाने व्हायरल होत असून सोशल मीडियावर यावर अनेक विचारमंथन सुरू असल्याचेही दिसून येत आहे.
रतन टाटा यांनी आपले विचार मांडताना इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे, ज्यामध्ये रतन टाटा यांनी लिहिले की, ‘हे वर्ष प्रत्येकासाठी अत्यंत आव्हानात्मक असेच आहे. ऑनलाईन असणारा हा एक समाज एकदुसऱयांच्या भावना दुखवण्याचा सातत्याने प्रयत्न करत असल्याचे मला दिसून आले असून माझा हा अनुभव आहे. प्रत्येक जण एकमेकांना खाली ओढण्याचा प्रयत्न करत असून या कारणामुळे एकमेकांविषयी अत्यंत चुकीचे मत तयार होत आहे. मला वाटतं या वर्षी आपण सर्वांनी एकत्र येऊन एकमेकांची मदत करायला हवी. एकमेकांना खाली खेचण्यापेक्षा आपण एकत्र यायला हवं आणि ही एकमेकांना पाण्यात पाहायची वेळ नक्कीच नाही. सध्याच्या काळात एकमेकांविषयी सर्वात जास्त संवेदनशीलता, दयाळूपणा आणि समजूतदारीने वागण्याची आणि ती दाखवण्याची अत्यंत गरज आहे.



























































