नवरदेवची वरात तहसीलच्या दारात; शिधापत्रिकासाठी अनोखे आंदोलन

कुटुंबापासून विभक्त होऊनही वेगळी शिधापत्रिका मिळत नसल्याने एका नवरदेवाने चक्क तहसील कार्यालयातच आपली वरात नेल्याची घटना पाटोद्यात घडली. हा कोणताही विवाहसोहळा नव्हता तर गांधीगिरी मार्गाने निवेदन देत शिधापत्रिका मिळवण्यासाठी हे प्रयत्न असल्याचे या नवरदेवाचे म्हणणे आहे.

हल्ली शिधापत्रिका मिळवण्यासाठी रेशनिंग ऑफीसला वारंवार खेटा घालाव्या लागतात. काही वेळा दलालांकडून ही कामे होता. पाटोद्यातील एका तरूणाने कुंटुबापासुन विभक्त होऊन वेगळी शिधापत्रिका मिळावी यासाठी पुरवठा विभागाकडे अर्ज केला होता. मात्र सरकारी नियमामध्ये कुटुंबात अन्य सदस्य नसल्या कारणाने शिधापत्रिका देता येत नसल्याचे कारण देण्यात आले.

यावर गांधीगिरीची भूमिका घेत पाटोदा येथील अमित आगे या युवकाने सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास नवरदेवाचा पेहराव घालुन आपली वरात पाटोदा तहसील कार्यालयाच्या दारात काढली. हे अनोखे आंदोलन पाहण्यासाठी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. यावेळी तहसील कार्यालयाच्या आवारात तहसील व पुरावठा विभागाच्या मनमानी कारभारवर विरूध्द घोषणा देत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकत्र्यांनी आंदोलन केले.

सोशल मिडीयावर लग्नपत्रिका व्हायरल

दोन दिवसापुर्वींच या आंदोलनरूपी विवाहसोहळ्याची पत्रिका लढा आणि विजय मिळवा या घोषवाक्याखाली सोशलमिडीयावर व्हायरल केली होती. चक्क नवरदेवाच्या वेशाष घोड्यावर बसुन अमित आगे हा युवक वऱ्हाड्यांसह वाजतगाजत छत्रपती शिवाजी महाराज चौका पासुन तहसील कार्यालया पर्यंत वरात घेऊन आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या