रत्नागिरी – 1 डिसेंबरपासून अनधिकृत टपऱ्यांवर नगरपरिषदेचा हातोडा

रत्नागिरी शहराचे प्रवेशद्वार असलेल्या साळवी स्टॉप येथून अनधिकृत टपऱ्यांचे साम्राज्य उभे राहिले आहे.अनधिकृत टपऱ्यांमुळे शहराची अवस्था बकाल झाली असल्याने मंगळवार दिनांक 1 डिसेंबरपासून अनधिकृत खोके, टपऱ्या आणि अतिक्रमण करणाऱ्यावर नगरपरिषद कारवाई करणार असून हि कारवाई साळवी स्टॉपपासून सुरू होणार असल्याचे नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी सांगितले.

रत्नागिरी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे नगरसेवक राजन शेट्ये यांनी अनधिकृत टपऱ्या आणि खोक्यांविरूध्द कारवाई करण्याची मागणी केली.बाजारपेठेतही अनेक ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले असल्याची तक्रार राजन शेट्ये यांनी मांडताच नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी अनधिकृत खोक्यांवर आणि फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. 1 डिसेंबरपासून साळवी स्टॉप येथून कारवाईची मोहिम सुरू होईल ज़र कारवाईत नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी कुचराई केल्यास त्यांच्यावर आम्ही कारवाई करू असा इशारा साळवी यांनी दिला.या कारवाईत कोणत्याही नगरसेवकांनी हस्तक्षेप करू नये अशी सूचना त्यांनी दिली.

साळवी स्टॉप येथे काही दिवसांपासून अनधिकृत खोक्यांची संख्या वाढली. हे अनधिकृत खोके टाकणारे ठराविक लोक आहेत असा अनेकांचा समज होता मात्र या खोक्यात एक ” खाकी” बोका असल्याची चर्चा सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या