
गणपतीपुळे येथून पुण्याकडे निघालेल्या पर्यटकांच्या कारला रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर नाणीज इरमलवाडी येथे अपघात झाला. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून एक व्यक्ती जखमी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय तांबोळी हे आपल्या कारने गणपतीपुळ्याहून कोल्हापूरला जात होते. त्यांची गाडीला नाणीज इरमलवाडी येथे ट्रकला जोरदार धडक बसली.
समोरासमोर धडक झालेल्या अपघातात कारमधील कैवल्य कुलकर्णी यांना गंभीर दुखापत झाली. तर संजय तांबोळी हेदेखील जखमी झाले होते. गंभीर जखमी झालेल्या कैवल्य कुलकर्णी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघाताची नोंद ग्रामीण पोलीस स्थानकात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.



























































