रत्नागिरीत ढगाळ वातावरण; संततधार पाऊस

499

रत्नागिरी जिल्ह्यात आज दिवसभर ढगाळ वातावरणात संततधार पाऊस पडत होता. रत्नागिरी, गुहागर, राजापूर, लांजा, संगमेश्वर आणि चिपळूण तालुक्यांना पावसाने झोडपून काढले. गेल्या 24 तासात सरासरी 45 मिमी पावसाची नोंद झाली.संततधार पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. संततधार पाऊस सुरू असला तरी लॉकडाऊनमुळे रस्त्यावर फारशी रहदारी नव्हती. पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या