रत्नागिरी- कोरोनाचे आणखी 18 रूग्ण सापडले

397

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे आणखी 18 रूग्ण सापडले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 287 वर पोहचली आहे. गेल्या तीन दिवसात जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. काल दिवसभरात एकूण 42 अहवाल प्राप्त झाले आहेत. यातील 18 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये रत्नागिरी 7, कळंबणी 8, गुहागर 1, राजापूर 2 अशी विभागणी आहे.

100 रूग्ण बरे झाले
दरम्यान रविवारी सायंकाळी उशिरा एका रुग्णाला घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या आता 100 झाली आहे. यासोबत 32 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून दोन अहवाल अनिर्णित आहेत. रत्नागिरी येथील 7 पैकी 6 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. इतर सर्व रुग्णांना दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या