
बुधवारी रात्री 8 वाजल्यापासून रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिह्यात कडक लॉकडाऊनच्या (संचारबंदी) अंमलबजावणीला सुरू होणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कोणालाही बाहेर फिरता येणार नाही. तसे फिरल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. किराणासह अत्यावश्यक सेवेत येणाऱया व्यावसायिकांनी घरपोच सेवेवर भर द्यावा. त्यासाठी हेल्पिंग हॅण्डच्या स्वयंसेवकांचीही मदत घेतली जाणार आहे. सध्या जिह्यात कोरोनाच्या 1200 ऑक्टिव्ह रुग्णांची संख्या 30 एप्रिलपर्यंत चारपट होण्याची भीती आहे. त्यामुळे आपल्याकडे कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी झाल्यास परिस्थिती आटोक्यात येऊ शकते, असे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी झूम ऍपद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
पुढे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा म्हणाले की, आज रात्री 8 वाजल्यापासून जिह्यातील सर्व चेकपोस्टवर कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. रत्नागिरी जिह्यात प्रवेश करण्यासाठी जे तीन प्रमुख मार्ग आहेत, त्याठिकाणी बाहेरून येणाऱया लोकांवर लक्ष ठेवले जाईल. लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे मुंबईहून अनेकजण रत्नागिरीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अत्यावश्यक काम असेल तरच लोकांनी जिह्यात यावे. पण जिह्यात येण्यापूर्वी त्यांची आरटीपीसीआर चाचणी केली जाईल. कोकण रेल्वेच्या स्थानकांवरही बाहेरून येणाऱया प्रवाशांची तपासणी केली जाणार आहे.
शिक्षकांची आरोग्य मित्र म्हणून मदत
गतवर्षी लॉकडाऊनच्या काळात शिक्षकांनी आरोग्यमित्र आणि पोलीसमित्र म्हणून काम केले होते. आताही आम्ही आरोग्यमित्र म्हणून शिक्षकांची मदत घेणार आहोत. त्याचबरोबर नार्ंसग कॉलेजमध्ये शिकणाऱया विद्यार्थिनींनाही नर्स म्हणून कोविड सेंटरमध्ये काम करण्यासाठी आम्ही विनंती करणार आहोत. हेल्पिंग हॅण्डच्या माध्यमातून स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे. हे स्वयंसेवक कोविड सेंटरपासून चेकपोस्ट आणि वस्तू घरपोच करण्यासाठी मदत करणार आहेत.
– लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हाधिकारी




























































