रत्नागिरी तालुक्यातील 844 शिक्षकांची कोरोना चाचणी, पाचवी ते आठवी वर्ग सुरू होणार

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने आता पाचवी ते आठवी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार आहे.त्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी तालुक्यातील शिक्षकांची आरटीपीसीआर कोरोना चाचणी घेण्यात येत आहे.तालुक्यातील 1003 शिक्षकांपैकी 844 शिक्षकांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे.

कोरोनाबाबत योग्य ती काळजी घेत यापूर्वी नववी आणि दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले होते. त्यानंतर आता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.वर्ग सुरू करण्यापुर्वी शिक्षकांची कोरोना चाचणी घेण्यात येणार आहे.

रत्नागिरी तालुक्यात 23 जानेवारी रोजी 469 शिक्षकांची आणि आज 24 जानेवारी रोजी 375 शिक्षकांची कोरोना चाचणी घेण्यात आली.जिल्हा महिला रुग्णालय रत्नागिरी येथे आज सकाळी गटशिक्षणाधिकारी सशीला मोहिते यांनी भेट दिली इयत्ता 5 वी ते 8 वी अध्यपन करणाऱ्या शिक्षकांची कॉविड -19 चाचणी बाबत आरोग्य अधिकारी यांचे समवेत चर्चा केली.

आपली प्रतिक्रिया द्या