
मागील चोवीस तासात जिल्ह्यात तब्बल 157 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 4 हजार 529 वर पोचली आहे. नव्याने आलेल्या अहवालानुसार आरटीपीसीआर टेस्ट केलेले 70 आणि अँटिजेन टेस्ट केलेले 87 असे एकूण 157 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.
नव्याने आलेल्या अहवालानुसार रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 65 रुग्ण सापडले आहेत. याशिवाय खेड 28, गुहागर 21, चिपळूण 30, संगमेश्वर 10, लांजा 3 असे रुग्ण सापडले आहेत.गेल्या काही दिवसात जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. आज 49 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आता पर्यंत 2871 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात 141 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.





























































