रत्नागिरीत पाच केंद्रावर लसीकरण, जाणून घ्या तुमच्या जवळचे केंद्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांच्या कोविड लसीकरणासाठी लसीकरण पाच केंद्र निश्चित करण्यात आली आहे. मिस्त्री हायस्कूल, ग्रामीण रुग्णालय, राजापू, ग्रामीण रुग्णालय गुहागर अंतर्गत जीवन शिक्षण शाळा क्र.1, नगरपरिषद दवाखाना चिपळूण, नगरपरिषद दवाखाना खेड येथे प्रत्येकी दीड हजार कोव्हीशिल्डचे डोस देण्यात आले आहे.

दिलेल्या लसीचा वापर पुढील सात दिवसांकरिता करावयाचा असून पहिले सहा दिवस प्रत्येक सत्राचे उद्दिष्ट 200 लाभार्थ्यांसाठी असून  सातव्या दिवशी 300 लाभार्थ्यांना लसीकरण करावयाचे नियोजन करण्यात आले आहे.

सदर लसीकरण मोहिम 2 मे  पासून सुरु करण्यात येत आहे. हे लसीकरण पूर्णपणे ऑनलाईन पध्दतीने नोंदणी केलेल्या 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांसाठीच असेल. सत्राच्या ठिकाणी ऑनस्पॉट रजिस्ट्रेशन करुन कोणत्याही लाभार्थीना लसीकरण करु नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.