एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार, रत्नागिरीत वाजत-गाजत बाप्पाचे आगमन 

एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार…गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात आज वाजत-गाजत बाप्पाचे आगमन झाले. गणपती बाप्पाच्या स्वागताला आज पावसानेही हजेरी लावली.रत्नागिरी जिल्ह्यात 1 लाख 66 हजार 986 घरगुती गणपती आणि 116 ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत आहे.

गणेशोत्सव हा कोकणातील मोठा सण घराघरात साजरा केला जातो.आज वाजत-गाजत गणपती बाप्पांचे आगमन झाले.आज सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली होती.घरोघरी आज वाजत-गाजत आगमन झाले त्यानंतर गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.पुजाअर्चा,आरती यामुळे घराघरात मंगलमय वातावरण निर्माण झाले होते.घरच्या गणपतीसाठी लाखोच्या संख्येने चाकरमानी गावी आले आहेत.घरोघरी आकर्षक सजावटी,मखर तयार करण्यात आली आहेत.आज वाजत-गाजत आणि जयघोषात गणपतीबाप्पा घरोघरी विराजमान झाले.

कर्ले-आंबेशेत मिरवणूकीचे 38 वे वर्ष

रत्नागिरी शहरातून निघणारी कर्ले-आंबेशेत गणपती आगमन मिरवणूक शिस्तबध्द पध्दतीने काढण्यात आली.ढोल-ताशे आणि लेझीमच्या तालावर हि मिरवणूक काढण्यात आली. कर्ले-आंबेशेत गणपती आगमन मिरवणूक पहाण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.गणेश आगमन मिरवणूकी दरम्यान कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.