रत्नागिरीतील ग्रामपंचायत पोट निवडणूक कार्यक्रम जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

ऑक्टोबर 2018 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकींसाठी आणि सरपंच पदासाठी थेट निवडणुकीद्वारे भरण्यात येणाऱ्या रिक्त पदांच्या पोट निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकामध्ये मंडणगड तालुका – 01-लाटवण ग्रामपंचायत, प्रभाग क्र.1,2,3, 02-दाभट ग्रामपंचायत प्रभाग क्र. 1,2,3 मतदान केंद्र संख्या 6. दापोली तालुका -01 -बांधतिवरे ग्रामपंचायत, प्रभाग क्र.1,2,3, 02-भोमडी ग्रामपंचायत, प्रभाग क्र.1,2,3 मतदान केंद्र संख्या 6,. खेड तालुका- 01 दिवाणखवटी ग्रामपंचायत, प्रभाग क्र. 1,2,3, मतदान केंद्र संख्या 4, संगमेश्वर तालुका 01-कोळंबे ग्रामपंचायत, प्रभाग क्र. 1,2,3, धामापूर तर्फे देवरुख ग्रामपंचायत, प्रभाग क्र.1,2,3, मतदान केंद्र संख्या 6,. रत्नागिरी तालुका 01-भोके ग्रामपंचायत, प्रभाग क्र.1,2,3, 02- मर्वी ग्रामपंचायत, प्रभाग क्र.1,2,3, मतदान केंद्र संख्या 6,. लांजा तालुका 01-शिपोशी ग्रामपंचायत प्रभाग क्र.1,2,3, मतदान केंद्र संख्या 3. राजापूर तालुका 01-तेरवण ग्रामपंचायत प्रभाग क्र.1,2,3, 02-पेंडखळे ग्रामपंचायत प्रभाग क्र.1,2,3, 03-शिणगीणी ग्रामपंचायत प्रभाग क्र.1,2,3, 04-दसूर ग्रामपंचायत, प्रभाग क्र. 1,2,3, 05-भू ग्रामपंचायत प्रभाग क्र.1,2,3,मतदान केंद्र संख्या 15 यांचा समावेश आहे.