रत्नागिरीतला कडक लॉकडाऊन वाढवला; आता 15 जुलैपर्यंत घरात बसा

1030

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी मिशन ब्रेक द चेन अंतर्गत लावण्यात आलेल्या लॉक डाऊन ची मुदत 15 जुलै पर्यंत वाढविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.

जून महिन्यात कोरोनाच्या रूग्णांची संख्या अधिक वाढल्याने आणि प्रवासाचा कोणताही इतिहास नसतानाही काही कोरोनाबाधित रूग्ण सापडले होते.त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी १ ते ८ जुलै दरम्यान रत्नागिरीत लॉकडाऊन लागू करण्यात आला होता.कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने हाँ लॉकडाऊन १५ जुलै पर्यंत वाढविण्यात आला आहे.या कालावधीत पूर्वीच्या लागू असलेल्या निर्बंधांना पंधरा जुलै पर्यंत कायम ठेवण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या