सोशल डिस्टन्सिंग ठेवून श्रावणात घुमणार नामसप्ताहाचा गजर, उदय सामंत यांची माहिती

600

श्रावण महिन्यात मंदिरांमध्ये होणार्‍या नामसप्ताहावर कोरोनाचे सावट पसरले आहे. मंदिरामध्ये सोल डिस्टन्सिंग ठेवून प्रभूनामाचा गजर होणार आहे. मंदिरामध्ये केवळ 5 लोकांनी पुजा व अन्य विधी करायचे असून ओट्या भरणे, प्रसाद आणि मिरवणूक काढू नये अशी सूचना आजच्या पाचजणांच्या समितीत करण्यात आली असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

श्रावण महिन्यात उत्सवासंदर्भात एक बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. श्रावणात शंकराच्या मंदिरात, दत्त मंदिरात आणि मारुतीच्या मंदिरात नामसप्ताह केले जातात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा नामसप्ताहाची एक समिती स्थापन करण्यात आली़. या समितीमध्ये अ‍ॅड. भाऊ शेट्ये, आदेश चवंडे, मुन्ना सुर्वे, बापू गवाणकर आणि दिनेश सावंत यांची नेमणूक करण्यात आली आहे. नामसप्ताहामध्ये मंदिरात गर्दी करु नका. केवळ पाच लोकांनीच मंदिराच्या पुजाअर्चेत पुढाकार घ्या अशा प्रकारची चर्चा आजच्या बैठकीत झाल्याचे सामंत यांनी सांगितले.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्लाझ्मा थेरपीसाठी बरे होऊन गेलेल्या 600 रुग्णांना आवाहन केले आहे की त्यांनी जर प्लाझ्मा दान केला तर ते त्यांच्यापेक्षा तिप्पट लोकांचे प्राण वाचवू शकतात. रत्नागिरीतील काही डॉक्टरांनी प्लाझ्मा थेरपीचे प्रशिक्षण घेतले आहे असे सामंत यांनी सांगितले. गणेशोत्सवात सरपंचांनी केलेले ठराव त्यांच्या भावना लक्षात घेऊन येणार्‍या चाकरमान्यांबाबत लवकरच राज्यसरकार निर्णय घेईल. काही दिवसांपुर्वी मुंबईत आमची प्राथमिक बैठक झाली. त्या बैठकीतील प्रस्ताव आम्ही मुख्यमंत्र्यांकडे पाठवले आहेत असेही सामंत यांनी सांगितले.

तिवरे धरणाबाबत ज्यांनी टिका केली तेच जनतेला फसवत आहेत. श्री सिध्दीविनायक ट्रस्टने दिलेले पाच कोटी जिल्हा प्रशासनाकडे जमा झाले असून उर्वरित निधी लवकरच देण्यात येणार आहे. तिवरेवासियांच्या घराचा प्रश्न लवकरच सुटेल असे आश्वासन सामंत यांनी दिले.

आपली प्रतिक्रिया द्या