रत्नागिरी – मिरकरवाड्यात भिंत पडल्याने अनेक गाड्यांचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तौकते वादळाचा धुमाकूळ संपूर्ण रात्रभर सुरूच होता. वादळाने जिल्हाची वेस ओलांडल्या नंतर देखील वादळी वाऱ्याने जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले. रात्रभर सुटलेल्या वादळी पावसाने मिरकरवाडा परिसरात दाणादाण उडवली. मिरकरवाडा जेटीवर उभ्या नौकाना वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला. नौका एकमेकांवर आदळून नौकांचे नुकसान झाले. रात्रभर हा प्रकार सुरू होता. भीतीपोटी मच्छीमारांनी रात्रभर जागून काढली. मिरकरवाडा पांढरा समुद्र येथील कांचन ओशियन व्ह्यू समोरील भिंत कोसळली. या भिंतीखाली अनेक गाड्या गाडल्या गेल्याने नुकसान झाले.