50 हजारांची खंडणी दिली नाही म्हणून मोबाईल व्यावसायिकावर हल्ला

409

रत्नागिरी शहरातील मोबाईल विक्रेते मनोहर ढेकंणे यांच्यावर गोळी झाडून हल्ला केल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता बंदररोड येथे घडली. 50 हजारांची खंडणी मागण्यासाठी आलेल्या दोघांनी खंडणी दिली नाही म्हणून रागाने ढेकंणे यांच्यावर गोळी झाडली. ढेकंणे यांना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल कंरण्यात आले. आज त्यांनी रत्नागिरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हल्लेखोर फरार झाले असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

मनोहर ढेकंणे यांचे आठवडाबाजार येथे नॅशनल मोबाईल्स हे दुकान आहे. शुक्रवारी रात्री ते दुकान बंद करुन आपल्या घरी गेले. घराजवळ असताना एका कारमधून सचिन जुमनाळकंर आणि त्याचा सहकारी त्यांच्याजवळ आला. त्यांनी ढेकंणे यांच्याकडे 50 हजार रुपयांची खंडणी मागितली. खंडणी देण्यास नकार दिल्याने सचिन जुमनाळकर याने ढेकंणे यांच्यावर गोळी झाडली. ही गोळी ढेकणे यांच्या पोटात लागली़ त्यानंतर त्यांना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल कंरण्यात आले. हल्ल्यानंतर सचिन जुमनाळकंर आणि त्याचा सहकारी दोघेही फरार झाले असून पोलीस त्या दोघांचा शोध घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या