रत्नागिरी – गेल्या 24 तासात 102 नवे रुग्ण, 5 बाधितांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 102 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1438 झाली आहे. दरम्यान 45 रुग्णांना   बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 858  झाली आहे. आज बरे झालेल्यांमध्ये जिल्हा कोव्हीड रुग्णालय 6, कोव्हीड केअर सेंटर केकेव्ही, दापोली 3, कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण 2, कोव्हीड केअर सेंटर घरडा, खेड 21,कोव्हीड केअर सेंटर वेळणेश्वर, गुहागर 3 आणि 10 कोव्हीड केअर सेंटर पेंढांबे, चिपळूण मधील आहेत.

राजापूर येथील एका 65 वर्षीय कोरोना रुग्णाचा, तसेच रत्नागिरी येथे 68 वर्षीय ॲन्टीजेन चाचणीत पॉझिटिव्ह आलेल्या महिला रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर खेड येथे 2 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यांचे अनुक्रमे वय 71 व 40 वर्षे अशी आहेत. तसेच चिपळूण येथे 49 वर्षीय कोरोना रुग्णाचाही उपचार दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या आता 49 झाली आहे.

जिल्ह्यात सध्या 131 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 21 गावांमध्ये, दापोली मध्ये 5 गावांमध्ये, खेड मध्ये 24 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 6, चिपळूण तालुक्यात 61 गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात 3 , गुहागर तालुक्यात 8 आणि राजापूर तालुक्यात 3 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.