
मत्स्यव्यवसाय विभागाने भारतीय कृषी संशोधन परिषद केंद्रीय सागरी मात्स्यिकी संशोधन संस्थेकडून आयसीएआर-सीएमएफआरआय आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने पाचवी सागरी मत्स्य जनगणना 3 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. 18 डिसेंबर 2025 पर्यंत जनगणना करण्यात येणार आहे, असे मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त सा.वि. कुवेसकर यांनी सांगतिले. सुमारे 12 लाख मत्स्यव्यवसायिक कुटुंबे, 568 मत्स्य गावे आणि 173 मत्स्य उतरण केंद्रांबद्दल अचूक आणि तात्काळ माहिती संकलित करण्यात येणार आहे.
जनगणनेकरीता केंद्रीय समुद्री मत्स्य अनुसंधान संस्थान कोचीने तयार केलेल्या व्यास एनएव्ही या अॅपसह टॅबलेट पी.सी. वितरित केले जात आहेत. याद्वारे प्रगणक आणि पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण व समावेशन केले जाईल आणि जनगणना चौकटीची अचूकता सुनिश्चित केली जाईल.
सागरी मात्स्यिकी जनगणनेचे उद्दिष्ट, केवळ आकडेवारीपुरते मर्यादित नाही तर सुमारे 12 लाख मत्स्यव्यवसायिक कुटुंबे, 568 मत्स्य गावे आणि 173 मत्स्य उतरण केंद्रांबद्दल अचूक आणि तात्काळ माहिती संकलित करणे तसेच सागरी मात्स्यिकी क्षेत्राच्या विकास नियोजनासाठी उपयुक्त असणारी माहिती तसेच सागरी मच्छिमार, मासेमारी गावे आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रामध्ये उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांबद्दल व्यापक माहिती गोळा करणे आहे.
 
             
		





































 
     
    





















