Ratnagiri News – दाभोळ येथे एलईडी दिवे लावून मासेमारी करणारी नौका पकडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एलईडी दिवे लावून सुरू असलेल्या अवैध मासेमारी विरोधात मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त रत्नागिरीच्या पथकाने ऑपरेशन क्लीन-सी मोहिम राबवली आहे. मंगळवारी रात्री दाभोळ येथे एलईडी दिवे लावून मासेमारी करणारी सफा मरवा-1 ही नौका मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या पथकाने पकडली. गेल्या आठ दिवसांतील पकडलेली ही पाचवी मच्छिमार नौका आहे.

दाभोळ बंदरात एलईडी दिवे लावून मासेमारी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या पथकाने मंगळवारी रात्री पाठलाग करून सफा मरवा-1 ही नौका पकडली. ही कारवाई मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली परवाना अधिकारी दिप्ती साळवी, स्वप्नील चव्हाण, विनायक शिंदे, सुरक्षा रक्षक राजन शिंदे, योगेश तोस्कर आणि प्रतिक शिर्के यांनी केली.